Thursday, 8 October 2015

घरच्या घरी बनवा मोबाइल पासून प्रोजेक्टर

घरच्या घरी बनवा मोबाइल पासून प्रोजेक्टर

सर्व साहित्य अगदी घरातल्या घरात उपलब्ध करून हा प्रोजेक्टरआपणास
 बनविता येतो.

१) एक रिकामे खोके घ्या 

२) एक ५०/७५ mm चे बहिर्वक्र भींग घ्या 

३) खोक्याच्या एका बाजुला भींगाच्या आकाराचे छीद्र पाडा 

४) त्या ठिकाणी भींग तंतोतंत बसवा 

५) खोक्याच्या आत मोबाइल ठेवता येईल असे स्टँड ब.नवा किंवा इतर 

व्यवस्था करा 

६) मोबाइलवर व्हिडिओ प्ले करा 

आता ही झाली फक्त रचना .


इथून पुढे आपल्याला काम करायचे आहे .

मोबाइल व भींगातील अंतर व प्रजेक्टर ते स्क्रीनमधले अंतर अॅडजेस्ट 

करावे लागेल. नेमक्या किती अंतरावर खोक्यात मोबाइल ठेवावा व 

पडद्यापासुन किती अंतरावर प्रोजेक्टर ठेवावा म्हणजे आपल्याला 

सुस्पष्ट व मोठी प्रतिमा मिळेल ते पहावे. या जागा फिक्स करून 

घ्याव्यात. खोके पॅक करुन मोबाइल काढण्या ठेवण्याची व्यवस्था केली 

की झाले आपले प्रोजेक्टर तयार !


मोबाइल चे रिझोल्युशन कमी असते त्यामुळे चित्र अंधुक दिसण्याची 

शक्यता असते त्यासाठी मोबाइल चा ब्राइटनेस पुर्ण वाढवावा. आवाज 

वाढवण्यासाठी बाजारात चायना साउंड अगदी १०० रुपयांपासुन उपलब्ध 

आहेत , ते वापरावे. चार्जेबल साउंड असतील तर चांगलेच म्हणजे 

विजेचा प्रश्न उरणार नाही. खोलीत पुर्णपणे अंधार ठेवावा.

काही टिप्स - 

१. मोबाईल ऑटो रोटेट होऊ नये म्हणून, ऑटो रोटेट डिसेबल करा.

२. मोबाईल घट्ट एका ठिकाणी ठेवण्यासाठी गव्हाच्या पिठाची कणिक 

किंवा, क्ले वापरू शकता.

यासाठी हा व्हीडीओ पहा
http://m.youtube.com/watch?v=Tx4vPeL9y2g

No comments:

Post a Comment