Thursday, 8 October 2015

आजचा भाजीपाला सल्ला

भाजीपाला सल्ला

- रांगडा कांदा पिकाची लागवड केली असल्यास लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांनी तण नियंत्रणासाठी ऑक्‍सिफ्लोरोफेन 1.25 मि. लि. प्रति लिटरप्रमाणे फवारणी करावी.
- रब्बी हंगामातील वाटाणा पिकाची लागवड 15 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत करावी.

महाराष्ट्रात सध्या बऱ्याचशा भागात पाऊस झाला आहे. अनेक ढगाळ वातावरणही आढळत आहे, त्यामुळे भाजीपाला पिकांवर बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

टोमॅटो -
- टोमॅटोवरील रस शोषणाऱ्या किडी (फुलकिडी, पांढरी माशी व मावा) यांचे नियंत्रणासाठी इमिडाक्‍लोप्रीड (18.5 एस.सी.) 5 मिलि किंवा फिप्रोनील (5 ईसी.) 15 मिलि प्रति 10 लीटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
- फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (25 ई.सी.) 20 मिलि किंवा डेल्टामेथ्रीन (1 टक्का ईसी) अधिक ट्रायझोफॉस (25 टक्के ईसी) हे संयुक्त कीटकनाशक 20 मि.लि. सोबत करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम या प्रमाणात एकत्र करून प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

कांदा - 
- कांद्यावरील फुलकिडे व करपा नियंत्रणासाठी फिप्रोनील (5 एस.सी.) 15 मि.लि. किंवा कार्बोसल्फान (25 ई.सी.) 10 मिलि किंवा प्रोफेनोफॉस (50 ई.सी.) 10 मिलि अधिक मॅन्कोझेब किंवा क्‍लोरोथॅलोनील किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात 10 मि.लि. सरफॅक्‍टंट (स्टीकर) वापरून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
- मेटारायझिम ऍनासोपली या जैविक बुरशीनाशकाची 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी. फवारणी शक्‍यतो सकाळी ऊन पडण्याअगोदर करावी म्हणजे फुलकिड्यांचे चांगले नियंत्रण मिळू शकते.

मिरची - 
- मिरचीवरील लिफ कर्ल (चुरडा मुरडा) हा विषाणूजन्य रोग असून, या रोगाचा प्रसार पांढरी माशी, फुलकिडे आणि कोळी या रस शोषणाऱ्या किडींमार्फत होत असतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर 25 दिवसांनी पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस (50 ई.सी.) 10 मि.लि. प्रति लिटर यांची फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारण्या घ्याव्यात.
- फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच, फिप्रोनील (5 ई.सी.) 15 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- कोळी नियंत्रणासाठी, डायकोफॉल 20 मि.लि. किंवा फेनाझाक्विन 15 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

वांगी - 
- रोप पुनर्लागवडीनंतर 20 दिवसांनी प्रादुर्भावीत शेंडे दिसून आल्यास, ती काढून टाकावी. फळे तोडणीच्या वेळेस कीडग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.
- फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन (1 टक्का ई.सी.) अधिक ट्रायझोफॉस (35 टक्के ई.सी.) हे संयुक्त कीटकनाशक 20 मि.लि. किंवा क्‍लोरऍण्ट्रानिलीप्रोल (18.5 टक्के ई.सी.) 4 मि.लि. किंवा स्पिनोसॅड (45 एस.सी.) 5 मि.लि. प्रति लिटर पाण्यातून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी. 

No comments:

Post a Comment