रब्बी
ज्वारी उत्पादन वाढीसाठी करा सुधारित
तंत्राचा वापर
रब्बी
हंगामामध्ये प्रामुख्याने ज्वारी जिरायती शेतीमध्ये घेतली जाते. त्यातही
महाराष्ट्रामध्ये असलेल्या 23 टक्के हलक्या, 48
टक्के मध्यम व 29 टक्के भारी जमिनीवर हे पीक घेतले जाते,
त्यामुळे रब्बी ज्वारीची उत्पादकता ही खरीप ज्वारीच्या तुलनेत कमी
राहते.
हवामान -
समशीतोष्ण व कोरड्या हवामानात ज्वारीची वाढ चांगल्या प्रकारे होते.
बी भरण्याच्या वेळी हवेमध्ये थोडी आर्द्रता व ऊब असेल, तर ती
उपयुक्त आहे. दाणे पक्व होण्याच्या वेळी अगर नंतर हवामान कोरडे असावे. पावसात पीक
सापडल्यास उगवण शक्तीवर अनिष्ट परिणाम होतो.
जमीन -
पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत रब्बी
ज्वारीची पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 5.5 ते 8.5 सामू असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते.
पूर्वमशागत व मूलस्थानी जलसंधारण -
- पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उन्हाळ्यात उतारास आडवी शेती
मशागत करावी.
- नांगरट झाल्यानंतर हेक्टरी 5 टन शेणखत
मिसळावे. कुळवाच्या पाळ्या देऊन, जमिनीच्या उतारावर 3.60
x 3.60 चौ.मी. अशा आकाराचे वाफे तयार करावेत.
- त्यानंतर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीच्या जिरायती पेरणीसाठी शिफारशीत आहे.
पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी. पुन्हा सारा यंत्राच्या साह्याने गहू,
हरभरा पिकांसारखे वाफे पाडून आडवे दंड पाडल्यास पेरणीनंतर पडलेला
पाऊस अडून जिरतो. या तंत्राला मूलस्थानी जलसंधारण असे म्हटले जाते.
2) सुधारित वाण - कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे
शिफारस केलेले सुधारित/ संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावेत.
रब्बी ज्वारीचे सुधारित वाण -
मालदांडी 35-1
- स्थानिक जातीपासून निवड.
- खोडमाशी व खोडकिडा प्रतिकारक्षम.
- पाण्याचा ताण सहन करणारी.
- जिरायती परिस्थितीत लागवडीसाठी शिफारस.
- उत्पादन - हेक्टरी 15-17 क्विंटल
धान्य, तर 60-65 क्विंटल
वाळलेल्या कडब्याचे उत्पादन.
फुले यशोदा - एसपीव्ही 1359
-उंच वाढणारे, स्थानिक जातीपासून निवड.
-मध्य गच्च आकाराचे कणीस, दाण्याचा आकार
गोल टपोरा.
-अधिक धान्य आणि कडबा उत्पादन.
पाण्याचा ताण सहन करणारे तरी पाण्याच्या पाळ्यास प्रतिसाद.
- सी - 4 x आयएस 18370 या संकरातून निवड.
- 2005 मध्ये महाराष्ट्रातील मध्यम ते भारी जमिनीसाठी ओलीताखाली.
- आनुवंशिकदृष्ट्या आगळेवेगळे वाण.
- उंच वाढणारे असले तरी जमिनीवर लोळण्यास प्रतिकारक्षम.
- भाकरी व कडब्याची प्रत उत्तम.
- मावा या किडीस बऱ्याच प्रमाणात प्रतिकारक्षम.
- उत्पादन - हेक्टरी ओलिताखाली 35-37
क्विंटल धान्याचे, तर 85-90
क्विंटल वाळलेल्या कडब्याचे उत्पादन.
फुले चित्रा
- मध्यम जमिनीसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी लागवड शिफारस,
तर मराठवाड्यात मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस.
- 118-122 दिवसांत तयार होणारे वाण.
- पाण्याचा ताण, खोडमाशी व खडखड्या
रोगास प्रतिकारक्षम.
- मालदांडी व फुले माउलीपेक्षा अधिक उत्पादकता.
- उत्पादन - हेक्टरी 18-20 क्विंटल
धान्याचे, तर 55-60 क्विंटल
कडब्याचे उत्पादन.
फुले वसुधा
- आरएसएलजी 206 x एसपीव्ही 1047 या संकरातून निवड.
- 2007 मध्ये मध्यम ते भारी जमिनीवर लागवडीसाठी शिफारस.
- जरिायती तसेच ओलीतासाठी योग्य वाण.
- 116-120 दिवसांत तयार होणारे वाण.
- भाकरी व कडबा प्रत मालदांडीसारखी.
- खोडमाशी, खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
- जिरायती तसेच पाण्याच्या पाळ्यास प्रतिसाद देणारे वाण.
- उत्पादन - हेक्टरी 20-22 क्विंटल
धान्याचे, तर 55-60 क्विंटल कडबा
उत्पादन.
एसजीएस 8-4 (हुरड्यासाठी)
- हुरड्यासाठी शिफारस केलेला वाण.
- दुधाळ अवस्थेत दाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा गोडवा. (साखरेचे
प्रमाण अधिक).
- दुधाळ अवस्थेत दाणे कणसापासून सहजरीत्या वेगळे काढता येतात.
(गोंडर सोबत येत नाहीत.)
- शेतातील कणसे कापून नेऊन घरी दाणे चोळून काढून तव्यावर भाजून
खाण्याजोगे आगळेवेगळे वाण.
- खोडमाशीस मोठ्या प्रमाणावर प्रतिकारक्षम.
- सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या शेवटच्या
आठवड्यापर्यंत विशिष्ट अंतराने पेरणी केल्यास पूर्ण हंगामात हुरड्याचे उत्पादन
मिळू शकते
जमिनीचा प्रकार खोली सें.मी. - सुधारित/संकरित वाण
हलकी जमीन (30 सें.मी. खोलीपर्यंत) - फुले
माउली, फुले अनुराधा
मध्यम जमीन (60 सें.मी. खोलीपर्यंत) - फुले
सुचित्रा, फुले माउली, फुले चित्रा,
परभणी मोती, मालदांडी 35-1
भारी जमीन (60 सें.मी.पेक्षा जास्त
खोलीपर्यंत) - सुधारित वाण ः फुले वसुधा, फुले यशोदा,
सी.एस.व्ही.-22, पी.के.व्ही. क्रांती. संकरित
वाण ः सी.एस.एच.-15, सी.एस.एच.-19.
पेरणी -
- रब्बी हंगामात 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर 5 सें.मी.
खोलीपर्यंत 45 x 15 सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
- हेक्टरी 1.48 लाख रोपे असणे जरुरीचे आहे.
साधारणपणे दोन चाड्याच्या पाभरीने हेक्टरी 10 किलो बियाणे
लागते. - पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 4 ग्रॅम गंधकाची
किंवा थायोमेथोक्झाम (35 एफ.एस.) 10
मि.लि. अधिक 20 मि.लि. पाणी प्रति किलो या प्रमाणे
पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर बियाण्यास प्रतिकिलो 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व पी.एस.बी. या जिवाणूसंवर्धकाची तसेच 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशीची प्रक्रिया करावी.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन -
- हेक्टरी 10 ते 12
गाड्या शेणखत टाकावे.
- जिरायती ज्वारीस मध्यम जमिनीत (एकरी 16 - 08 - 00 किलो नत्र, स्फुरद व पालाश), भारी
जमिनीत (एकरी 24 - 12 - 00 कि. नत्र, स्फुरद
व पालाश) पेरणीच्या वेळी द्यावे.
- बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत (एकरी 32 - 16 - 16 किलो नत्र, स्फुरद व पालाश), भारी
जमिनीत (एकरी 40 - 20 - 20 कि. नत्र, स्फुरद
व पालाश) पैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व
उर्वरित अर्धे नत्र एक महिन्याने द्यावे.
- जिरायती ज्वारीस प्रति 1 किलो नत्र दिल्यास 10
ते 15 किलो धान्य उत्पादन वाढण्यास मदत होते.
आंतरमशागत -
- पिकाच्या सुरवातीच्या 35 ते 40 दिवस पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार 1-2 वेळा खुरपणी व पहिली कोळपणी 3 आठवड्यांनी फणीच्या
कोळप्याने तसेच दुसरी कोळपणी पासेच्या कोळप्याने आणि शेवटची कोळपणी 8 आठवड्यांनी कोळप्याला दोरी बांधून करावी, त्यामुळे
पिकांच्या मुळांना मातीची भर लागून पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होते.
पाणी व्यवस्थापन -
संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर 28
ते 30 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना 50
ते 55 दिवसांनी द्यावे.
- दोन पाणी देणे शक्य असल्यास पीक गर्भावस्था व पोटरीत असताना पाणी
द्यावे.
- बागायती ज्वारीमध्ये मध्यम जमिनीत तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात
असताना पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी
आणि कणसात दाणे भरताना पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी द्यावे.
महत्त्वाच्या टीप्स -
- जिरायती ज्वारीसाठी शक्यतो मध्यम ते भारी जमीन निवडावी.
- खरिपातील पीक काढणीनंतर वखराच्या साह्याने उतारास आडवी मशागत
केल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरमधील पावसाचे पाणी जमिनीत साठविले जाते.
- मराठवाडा विभागामध्ये ऑक्टोबर महिन्यात पहिला पंधरवडा हा
कालावधी पेरणीसाठी सर्वांत चांगला आहे. याहीपेक्षा लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा
प्रादुर्भाव, तर उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी
झाल्यामुळे बियाण्यांची उगवण कमी होते.
- पेरणीपूर्वी बियाण्यास 300 मेश
पोताच्या गंधकाची 4 ग्रॅम किंवा थायरमची 3 ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. थायामिथोक्झाम
(70%) 3 ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया केल्यास
खोडमाशीमुळे होणारी पोंगेमर कमी होते.
- जमिनीतील ओलाव्याच्या कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळींतील
अंतर 45 सें.मी. (18 इंच) आणि
हेक्टरी 10 किलो प्रमाणित बियाणे वापरून जिरायती रब्बी
ज्वारीची पेरणी करावी.
- उगवणीनंतर 3 आठवड्यांनी दोन रोपांतील
अंतर 15 सें.मी. ठेवून विरळणी करावी आणि हेक्टरी ताटांची
संख्या 1 लाख 35 हजार ठेवावी.
- सरी काढून त्यात पेरणी करणे ः
मध्यम ते भारी जमिनीवर (60 ते 90
सें.मी. खोल) जिरायती रब्बी ज्वारीच्या अधिक उत्पादनासाठी बळीराम
नांगराने दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. किंवा 60 सें.मी. किंवा सुधारित वखराने 45 सें.मी. अंतर
ठेवून पेरणीपूर्वी 15 दिवस अगोदर सऱ्या काढाव्यात. त्यात
तिफणीच्या साह्याने पेरणी करावी. सरीमध्ये पेरणी केल्यानंतर रासनी करू नये.
- रासायनिक खतांचा वापर - पेरणीपूर्वी 8
दिवस किंवा पेरणी करताना 1 हेक्टरी 40 किलो नत्र अधिक 20 किलो स्फुरद खोल (12 सें.मी.) पेरून द्यावे. उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ होते.
- पेरणीपूर्वी उत्तम शेणखत (750 किलो
शेणखत + 20 किलो नत्र/ हेक्टरी) दिल्यास सुद्धा चांगला
फायदा होतो.
आंतरमशागतीद्वारे ओलावा साठवणूक -
- कोळप्याच्या साहायाने दोन वेळेस अंतरमशागत करावी. काळ्या
जमिनीत पडलेल्या भेगा मातीने बुजल्याने बाष्पीभवन कमी होते. तसेच 2 कोळपण्यांचा खर्च कमी होते.
- पेरणी केल्यानंतर 3 आठवड्यांनी दोन
ओळीत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन (मूग, उडीद इत्यादी
काड) करावे.
- रब्बी ज्वारीच्या पेरणीनंतर 65 आणि 75
दिवसांनी 2 टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची
फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.
- आंतरपीक - अधिक उत्पादनासाठी रब्बी ज्वारी अधिक करडई यांचे 4ः4 किंवा 6ः3 या प्रमाणात आंतरपीक घ्यावे.
वरील सर्व तंत्रज्ञान कमी खर्चाचे असून, त्याचा तंतोतंत वापर केल्यास उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ होते. हेक्टरी 15-18 क्विंटल
धान्य आणि 65-70 क्विंटल कडबा मिळू शकतो.
Mahiticha farvupyog zala
ReplyDelete