पाणलोट क्षेत्र विकास ( भाग -1 )
महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत पाणलोट क्षेत्र
विकासाची वेगवेगळी कामे केली जातात, त्यामध्ये पाणलोट क्षेत्र
म्हणजे काय आणि मृद व जलसंधारण यांची कोणकोणती कामे घेतली
जातात या व अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे व पायाभूत माहिती
देणारा हा लेख नक्की वाचा -
पाणलोट क्षेत्र –
ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गीकरित्या वाहत येउन एका नाल्याव्दारे एका
ठीकाणाहून वाहते त्या संपूर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.
एखादया प्रवाहास प्रमाणबध्द मानून त्यामध्ये ज्या क्षेत्रामधून पाणी
वाहत येउन मिळते त्या संपूर्ण क्षेत्रास त्या प्रवाहाचे पाणलोट क्षेत्र असे
म्हणतात.
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रानुसार वर्गीकरण –
1. अतिलहान पाणलोट क्षेत्र (Micro Watershed) - 10 हेक्टर पर्यंत
2. लघु पाणलोट क्षेत्र (Mini Watershed) - 200 हेक्टर पर्यंत
3. उप पाणलोट क्षेत्र (Micro Watershed) – 4000 हेक्टर पर्यंत
4. नदीखोरे (River Valley) – क्षेत्र मर्यादा नाही
जलसंधारण कार्यक्रम –
शेतीसाठी संरक्षित जलसिंचनाची साधने निर्माण करणे, भुगर्भाची
पाणीपातळी वाढविणे, जमिनीची प्रचंड प्रमाणात होणारी धुप थांबविणे,
जमिनीची उत्पादकता वाढविणे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय
ग्रामपातळीवर उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे हे जलसंधारण
कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश आहेत.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन - पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे त्या
क्षेत्रातील उपलब्ध जमीन, पाणी , वनस्पती व इतर नैसर्गीक
साधनसंपत्तीचा योग्यरितीने वापर करणे, जेणेकरून खालील उद्ीष्टे
सफल होतील
अ. उदिष्टे –
1. जमिनीची धूप थांबविणे
2. पाणी अडवून जिरविणे
3. कृषि उत्पादन वाढविणे
4. जैविक समतोल राखणे
5. इंधन व चारा उपलब्ध करणे
6. प्रकल्प कालावधी व पूर्ततेनंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे
ब. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तत्वे –
1. जमिनीचा भूमी उपयोगीतेनुसार वापर करणे
2. जमीनीवर आवश्यक प्रमाणात जैविक आच्छादन वाढविणे
3. पावसाचे पाणी शक्यतोवर जागेवरच मुरविणे
4. नवीन ओघळीची निर्मीती थांबविणे तसेच जुन्या ओघळीवर
आवश्यक ठिकाणी बांधबंदिस्ती करणे.
5. अतिरीक्त पाणी सुरक्षित वेगाने बाहेर काढणे किंवा त्याचा साठा करणे
6. उपलब्ध जमीन, पाणी व वेळ याचा योग्य वापर करून जमीनीची
हानी न होता उत्पन्न वाढविणे
7. आंतरपीक पध्दती वापरून पीक घनता वाढविणे
8. मनुष्य-प्राणी, वनस्पती, जमीन व पाणी या साधनसंपत्तीचे संधारण
करणे व त्यांचा उपयोग मानवी जीवनासाठी एकात्मिक पध्दतीने करणे.
9. पर्यावरणाचा समतोल राखणे
10,उत्पादीत मालासाठी वाहतूक व बाजारपेठ इत्यादी व्यवस्था करणे.
-------- पाणलोट क्षेत्राचे काम हे माथ्यापपसुन पायथ्याकडे केले जाते.
भूजलाचे दृष्टिने पाणलोट क्षेत्राचे वर्गीकरण –
1. पांढरे भूजल क्षेत्र
2. करडे भूजल क्षेत्र
3. काळे भूजल /क्षेत्र
1 . पांढरे भूजल क्षेत्र – ज्या पाणलोट क्षेत्रातील एकंदर भूजलाचा उपसा
हा पुनर्भरणाच्या क्षमतेपेक्षा कमी आहे (पुनर्भरण क्षमतेच्या 65 टक्के
पेक्षा कमी)अशा पाणलोटाचे वर्गीकरण भूजल शास्त्रज्ञ पांढरे भूजल
म्हणून करतात.
2 . करडे भूजल क्षेत्र – ज्या पाणलोट क्षेत्रातील भूजलाचा उपसा पुनर्भरण
क्षमतेजवळ किंवा क्षमतेइतका पोहोचला आहे (पुनर्भरण क्षमतेच्या 65
ते 85 टक्के) त्यांना करडे भूजल क्षेत्र म्हणतात.
3 . काळे भूजल क्षेत्र – ज्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुनर्भरणाला धोका
पोहोचतो आहे (पुनर्भरण क्षमतेच्याही पलीकडे) त्यांना काळे भूजलक्षेत्र
म्हणतात.
भूजल सर्वेक्षण विभागाने आखणी केलेली पाणलोट क्षेत्रे ही फारच मोठी
आहेत. कृषि विभागाने यांचे आधारावर त्या पाणलोट क्षेत्राची
उपपाणलोट, लघुपाणलोट व सुक्ष्म पाणलोट अशी आखणी केलेली आहे.
अ. भूजल पाणलोट (G.S.D.A. Watershed) - 30000 ते 40000
हेक्टर
ब. उपपाणलोट (Sub Watershed) 15000 ते 20000 हेक्टर
क. लघुपाणलोट (Mini Watershed) 3000 ते 5000 हेक्टर
ड. सुक्ष्म पाणलोट (Micro Watershed) 500 ते 600 हेक्टर
मृद व जलसंवर्धन कामाचे प्रकार -
यंत्रणानिहाय पाणलोट क्षेत्रात करावयाची विविध मृद, जलसंवर्धन व
पुनर्भरण कामाचे प्रकार -
अ) बिगर वहीती क्षेत्रावरील उपचार-
1) वन विभाग –
1. वनिकरण व कुरण विकास
2. सलग समतल चर
3. वृक्ष लागवड
2) सामाजीक वनीकरण –
1. सलग समतल चर
2. वृक्ष लागवड/वनशेती
3. कुरण विकास
3) कृषि विभाग –
1. सलग समतल चर/खोल सलग समतल चर
2. पडीक व अवनत जमीनीवरील वनीकरण योजना
3. बांधावरील वृक्ष लागवड (मॉडेल क्र 5)
4. फळबाग लागवड (कोरडवाहू)
ब) वहीती क्षेत्रावरील उपचार-
1. जैविक समपातळी बांध बंदिस्ती
2. जैविक ढाळीची बांध बंदिस्ती
3. फळबाग लागवड
4. समतल मशागत
5. मजगी
6. कप्प्यांची बांधबंदिस्ती (Compartmental Bunding)
7. चिबड जमीन सुधारणा
क) ओघळ/नाला नियंत्रणाचे उपचार-
अप्पर रिचेस - 1. जैविक बांध
2. फांदी बांध
3. अनघड दगडी बांध (5 हेक्टर पर्यंत)
मिडल रिचेस 4. अनघड दगडी बांध (5 ते 10 हे.)
5. लहान मातीचे बांध (अर्दन स्ट्रक्चर)
6. गॅबियन बंधारा
7. शेततळे/विहीर व बोअर पुनर्भरण
लोअर रिचेस – 8. माती नाला बांध
- 10 ते 40 हे. पाणलोट क्षेत्र
- 40 ते 80 हे. पाणलोट क्षेत्र
- 80 ते 500 हे. पाणलोट क्षेत्र
- 500 ते 1000 हे. पाणलोट क्षेत्र
9. सिमेंट नाला बांध /काँक्रीट सिमेंट नाला बांध
10. वळण बंधारे
11. भूमीगत बंधारे
12. खोदतळे
13. पुनर्भरण चर
14.नाला काठाचे स्थिरीकरण/खोलीकरण/ सरळीकरण
4) लघुपाटबंधारे विभाग –
1. गावतळे
2. पाझर तलाव
3. कोल्हापूर पध्दतीचे बंधारे/ वळण बंधारे
4. जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन
5 काँक्रीट सिमेंट नाला बांध
5) भुजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा –
- हायड्रोफॅक्चरींग
- बोअर ब्लास्टींग
- जॅकवेल
- फ्रॅक्चर सील सिमेंटेशन
- . या व्यतीरिक्त ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच यांचे पण
नियोजन पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे अहवालात कार्यक्रम राबविताना
घ्यावे लागते.
No comments:
Post a Comment