मुरघास : जनावरांसाठी संरक्षित चारा

मुरघास : जनावरांसाठी संरक्षित चारा


दिवसेंदिवस वातावरणातील बदल बघून पशुपालकांनी जनावरांच्या संगोपनात बदल करणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे जनावरांना चारा न मिळाल्याने उपाशी राहणची परिस्थिती येऊ शकते. यावर
उपा म्हणून मुरघास या साठवण पद्धतीचा वापर केला पाहिजे. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत हिरवा चारा योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीने आंबवून साठवल्यावर मुरघास तयार होतो. यामध्ये साठवलेल्या चार्‍यामधील कोणतही अन्नघटकाचा जास्त प्रमाणात नाश होत नाही.

मुरघासासाठी आवश्यक पिके -

-    का, ज्वारी, बाजरी, ओट आणि गवती पिकांचा समावेश होतो. पिकाची कापणी फुलोर्‍याच्या वेळी (ऑगस्ट ते सप्टेंबर) करावी. कापणी उशिरा केल्यास चार्‍यामधील पोषणतत्वे कमी आढळतात.
-    पीक कापताना त्यात पाण्याचे प्रमा65 ते 70 क्क्यापेक्षा जास्त नसावे. याचे परीक्षण करण्यासाठी गवत हातात दाबून बघावे. जर हाताला पाणी लागले, तर पाण्याचे प्रमा65 टक्कंपेक्षा जास्त आहे, असे सजावे. तसे असल्यास गवत कापणीनंतर 1 ते 2 तास सावलीमध्ये सुकू द्यावे. नंतर मुरघास बनविण्यास वापरावे. कापणी यंत्राच्या सहाय्याने चारा बारीक कापून घ्यावा. (1 ते 2 इंचांचे तुकडे करावेत.)



मुरघास साठवणची पद्धत (सालो)

मुरघास साठवण्याच्याड्डा पद्धत, पिशवी पद्धत, टाकी पद्धत या  तीन पद्धती आहेत. सिेमेंटची खोली/ पिंप/प्लॅस्टिक पिशवी/प्लॅस्टिकची पाण्याची टाकी यामध्ये मुरघास हवाबंद स्थितीत ठेवता येतो. या पद्धतीत
खर्च कमी येतो. तसेच, छोट्या प्रमाणात मुरघास बनवू शकतो.

ड्डा पद्धत :

मुरघास बनविण्याची पद्धत तिन्हींमध्ये सारखीच आहे. खड्डा हा आवश्यकतेनुसार खोदावा. उदा. 1 चौ.फूट जागेत 14 ते 15 किलो गवत बसते. मोठ्या जनावरांसाठी 18 ते 20 किलो चारा लागतो. खड्ड्याच्या कडा गोल असाव्यात. त्याताकृती असू नयेत. त्यामध्ये प्लॅस्टिक अंथरावे. त्यामुळे जमिनीचा ओलावा चार्‍यात जाणार नाही. प्लॅस्टिकची टाकी असल्यास प्लॅस्टिक अंथरण्याची गरज नाही. बारीक केलेला चारा समांतर पद्धतीने सायलोमध्ये भरणे सुरू करून साधारणतः 3 ते 4 इंच व जास्तीत जास्त 1 फूटाचा थर बनवावा. सायलोमध्ये हवा राहू नये  म्हणून चारा पसरल्यावर तो दाबून घ्यावा. 100 किलो वैरणीला 5 ते 6 किलो ळी किंवा गूळ बारीक करून (पावडरसारखा) सप्रमाणात विभागून व प्रत्येक थरानंतर म्हणजे सालो भरेर्पंत टाकत राहावे. त्याचबरोबर 6 ते 7 किलो साधे मीठ टाकावे. सालो/ खड्ड्यामध्ये चारा भरताना खड्ड्याच्या वर 1 फूटार्पंत भरावा. नंतर त्यावर एक थर वाळलेल्या गवताचा पसरावा. प्लॅस्टिकने झाकून त्यावर मातीचा थर टाकून सालो/खड्डा हवाबंद करावा. प्लॅस्टिक टाकी वापरलेली असल्यास झाकण लावल्यावर वरून प्लॅस्टिकने झाकून घ्यावे. खड्डा वापरत असल्यास शक्यतो उथळ जागी करावा. पावसाची शक्यता असल्यास सालोवर कच्चे शेड बांधावे.

मुरघासाचे फायदे -

1 ते 2 महिन्यात चांगला मुरघास तयार होतो. आम्ल आणि अल्कोहोलमुळे एक प्रकारचा चांगला मोहक सुगंध आणि चव येते. हिरवी वैरण उपलब्ध नसताना दुष्काळी परिस्थितीत जनावरांना देता येतो. मुरघास साठविण्यासाठी फार कमी जागा लागते. मुरघास हा रसदार, कसदार व किफायतशीर आहे. त्यामध्ये क्त 10 ते 15 टक्के अन्नघटकांचा नाश होतो.

घ्यावयाची काळजी :

मुरघास काढताना एका बाजूने काढण्यास सुरवात करावी. पुन्हा प्लॅस्टिक झाकून घ्यावे. एका वेळी किमा3 ते 4 इंचांचा थर काढावा. दररोज सुरवातीला 2 ते 3 सेंमी. थर फेकून द्यावा, कारण त्याला हवा लागल्याने बुरशी लागलेली असते.



No comments:

Post a Comment