गाजर गवतापासून कंपोस्ट खत



गाजर गवतापासून कंपोस्ट खत

गाजर गवतापासून कंपोस्ट खत तयार करता येते. शेतकर्‍यांचा गैरसमज आहे की, या गवतापासून कंपोस्ट खत केल्यास शेताध्ये अधिक प्रमाणात हे गवत वाढेल. काही शेतकर्‍यांनी फूले असलेल्या गाजर गवतापासून ‘नापेड पद्धतीने' खत तयार केल्याने त्यांच्या शेतात गाजरगवताचा प्रादुर्भाव दिसून आला. कारण, नापेड किंवा उघड्या खड्ड्यात फूले असलेल्या गाजरगवतापासून खत बनविल्यास त्याचे अतिसूक्ष्म बी नाहीसे होत नाहीत. त्यामूळे 300 ग्रॅम खतात गाजरगवताच्या जवळपास 500 बिया आढळतात. परंतु, शास्त्रीय पद्धतीने गाजरगवताचे कंपोस्ट खत तयार केल्यास गाजरगवताचे बी शिल्लक राहत नाही.
खत तयार करण्याची पद्धत-
गाजरगवताचे बियाणे थंड व गरम हवामानाच्या बाबतीत असंवेदनशील आहे; त्यामूळे बियाण्याची सुप्तावस्था राहत नाही. या बियांची उगवणशक्ती चांगली असल्याने एकाच वेळी फूल असलेले व फूलविरहित गाजरगवत शेताध्ये आढळते. जेवढ्या लहान अवस्थेत गाजर गवत उपटून काढाल, तेवढे चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होईल. 

1. शेताध्ये उंच ठिकाणी म्हणजेच पाणी साचत नाही त्या ठिकाणी 10×6×3 फूट असलेल्या या आकाराचा खड्डा तयार करावा. आपल्या सुविधेनुसार गाजरगवताच्या उपलब्धतेनुसार खडड्याचे आकारान कमीजास्त करता येईल. 
2. शक्य असल्यास खड्ड्याच्या बाजूने व बाजूच्या कडेने दगडांचा भर लावावा. त्यामूळे जमिनीपासून पक्का खड्डा बनविला जाईल. 
3. दगड उपलब्ध न झाल्यास खड्ड्याच्या कडेचा भाग दाबून पक्का व समांतर करावा. शेतामधील व जवळपासच्या जागेतील गाजरगवत पूर्णपणे उपटून खड्ड्याच्या जवळ जमा करावे. 
4. खड्ड्याच्या जवळ 75 ते 100 किलो शेण 5 ते 10 किलो युरिया किंवा रॉक फॉस्फेट 1 पोते, 1 ते 2 क्विंटल माती आणि 1 टाकी पाणी टाकण्यासाठी भरून ठेवावी. 
5. अंदाजे 50 किलो गाजरगवत पूर्ण खड्ड्यामध्ये समांतर पसरावे. त्यावर 5 ते 7 किलो शेण 20 लिटर पाण्यात मिसळून त्याचा लेप गाजरगवतावर पसरावा. त्यावर 500 ग्रॅम युरिया व 3 किलो रॉक फॉस्फेट टाकावे. 
6. उपलब्ध असल्यास ट्रायकोडर्मा कल्चर पावडर 50 ग्रॅम प्रति थर याप्राणे खड्ड्यात टाकावे. या बुरशीनाशक कल्चरामूळे गाजरगवताचे लवकरात लवकर विघटन होऊन कंपोस्ट बनण्यास मदत होते.
अशाप्रकारे हे मीश्रण एकत्र करून एक थर तयार करावा.
7. पहिल्या थराप्रमाणे अनेक थर तयार करून खड्डा 1 फूट पष्ठभागाच्या वर येईल इतका भरावा. प्रत्येक थर तयार करताना गाजरगवत पायांनी चांगल्याप्रकारे दाबत राहावे.

8. गाजरगवत मूळांपासून उपटल्यानंतर मूळांसोबत मातीसुद्धा येते; पण ती माती पुरेशा प्रमाणात नसल्याचे वाटल्यास प्रत्येक थरात 10 ते 12 किलो गाळाची माती पसरावी. 

9. अशाप्रकारे खड्डा भरून शेण, माती व भुसा इत्यादींचे मीश्रण करून तयार केलेला लेप घुमटावर लावून बंद करावा. त्यानंतर 5 ते 6 महिन्यांनी चांगले कंपोस्ट खत तयार होईल. वरील शास्त्रीय पद्धतीने खत भरल्यास 37 ते 42 क्विंटल ताज्या गाजरगवतापासून 37 ते 45 टक्क्यांपर्यंत कंपोस्ट खत तयार होते.

कंपोस्ट खताची गाळणी -
पाच ते सहा महिन्यांनंतर खड्ड्याधून कंपोस्ट खत काढल्यानंतर असे दिसते की, जास्त जाडीचे गाजरगवत चांगल्या प्रकारे कुजलेले नाही; परंतु ते कुजलेले असते. कंपोस्ट खताला खड्ड्याधून बाहेर काढून सावलीच्या ठिकाणी सुकविण्यासाठी पसरवून ठेवावे. हवा लागल्यामूळे त्यातील आर्द्रता कमी होऊन कंपोस्ट सुकू लागते. थोडे सुकल्यानंतर ते जमा करून ढीग तयार करावा. ज्या शेतकर्‍यांजवळ बैलजोडी किंवा ट्रॅक्टर उपलब्ध असेल, त्यांनी तो ढिगार्‍यावर फिरवावा. असे केल्याने गाजरगवताचे अवशेष बारीक होऊन त्यापासून जास्तीचे कंपोस्ट खत मीळते. या पद्धतीने तयार झालेले कंपोस्ट 2 ×2 सेंमी. छिद्र असलेल्या जाळीने गाळून घ्यावे. गाळणीच्या प्रष्ठभागावर उरलेले अवशेष जमा करून ते वेगळे करावे. अशाप्रकारे तयार कंपोस्ट खत सावलीत सुकवून प्लॅस्टिक, ज्यूट, किंवा अन्य प्रकारच्या बॅगध्ये भरून पॅकिंग करावे. ज्या लोकांना किंवा शेतकर्‍यांना कंपोस्ट खत बनविण्यास व्यावसायिक रूप द्यायचे आहे, त्यांनी किचन गार्डन उपयोगासाठी 1, 2, 3 व 5 किलोंचे पॅकेट तयार करावे. व्यावसायिक व बागायती पिकांसाठी 25 ते 50 किलोच्या बॅग कराव्यात

खतापासून मिळणारी मूलद्रव्ये -
गाजरगवतपासून बनविलेल्या कंपोस्ट खतामध्ये अन्नद्रव्ये शेणखतच्या दुप्पट व गांडूळ खतात असलेल्या अन्नद्रव्याच्या जवळपास सारखीच आहेत.

घ्यावयाची दक्षता –
1. खड्डा मोकळ्या जागी, खुल्या हवेत व ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी असावा. गाजरगवत फूलधारणेच्या अगोदर उपटणे आवश्यक आहे. या अवस्थेत झाडास अधिक पाने असतात व झाड कोवळे असते. 

2. खत चांगल्या प्रकारे माती, शेण, भुसा यांचे मीश्रण तयार करून त्याचा लेप देऊन बंद करावा. खड्डा चांगल्या प्रकारे बंद न केल्यास वरच्या थरातील गाजरगवताचे बी कुजणार नाही.
3. कंपोस्ट खत बनविण्यासाठी गाजरगवत एकत्र केलेल्या ठिकाणी 20 ते 25 दिवसांत गाजरगवत उगवते. या नवीन उगवलेल्या गवताला फूलधारणेच्या आत उपटून नष्ट करावे; अन्यथा या गवताला लागलेल्या बियामूळे कंपोस्ट खत संक्रमीत होऊ शकते.
4. एका महिन्यानंतर आवश्यकतेनुसार खड्ड्यावर पाणी शिंपडत राहावे. त्यात कोरडेपणा आढळल्यास वरच्या थरावर सब्बलीच्या सहाय्याने छिद्रे तयार करून पाणी आतमध्ये टाकावे. पाणी टाकल्यानंतर छिद्रे बंद करावीत. या क्रियेमध्ये 60 ते 70 अंश सेल्सियस तापमान वाढते. त्यामूळे गाजरगवताच्या बियांची उगवण क्षमता नष्ट होते. खड्ड्यावरील लेप पूर्णपणे बंद राहील, याची दक्षता घ्यावी.

कंपोस्टचे फायदे -
1. गाजरगवताच्या कंपोस्ट खताच्या वापराने पीक, मनुष्य, प्राणी, निसर्ग यांवर विपरीत परिणाम होत नाही. कंपोस्ट खत तयार केल्यामूळे गाजरगवतातील ‘पार्थेलिन' या विषयुक्त रसायनाचे पूर्णपणे विघटन होते.

2. हे एक संतुलित खत असून हे खत कमी प्रमाणात वापरूनसुद्धा जमिनीची सुपीकता वाढविते. त्याचबरोबर गाजरगवताची निंदणी करून शेत गाजरगवमूक्त करून पिकांचे उत्पादन वाढवू शकतो.

वापरण्याचे प्रमाण -
1. सुरुवातीला शेत तयार करताना 2.5 ते 3 टन प्रति हेक्टर वापरावे.

2. भाजीपाल्याध्ये 4 ते 5 टन प्रति हेक्टर रोपे लावणीच्या वेळी द्यावे.
3. गाजरगवत कंपोस्ट खताचा वापर इतर जैविक पद्धतीने करावा.

No comments:

Post a Comment