Friday, 30 October 2015

हरभरा : घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण

हरभरा : घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण -


हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमूख डाळवर्गी पीक असून, ते राज्या साधारणतः 12.50 लाख हेक्टरवर घेतले जाते. विविध रोग व किडीमूळे हरभरचे उत्पादन कमी मिळते. हरभर्‍यावरील घाटेअळीपासून पिकाचे 30 ते 40 टक्के नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकर्यांनी जागरूक राहून किडींची ओळख करून पीक संरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करावा.
घाटेअळी किडींची मादी पतंग 150 ते 300 गोलाकार चकचकीत हिरवट पिवळ्या रंगाची अंडी पानावर, कोवळ शेंड्यावर, कळयावर व फूलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून 2 ते 3 दिवसांत अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामूळे पाने प्रथ पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळया संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन स्त करतात. त्यामूळे झाडावर क्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फूलोर्‍यावर ल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो. अळया प्रामुख्याने फूले व घाट्यांचे नुकसान करतात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन – 

अ) पेरणीपूर्वी व पेरणी करताना –

1)   उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करूनच पेरणी  केल्यामूळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तसेच उन्हामूळे रतात.
2)   गहू, सूर, मोहरी अथवा जवस आंतरपीक घेतल्यास घाटेअळीचा प्रादुर्भाव कमी होन्यादत होते. हरभरा पिकात आंतरपिक किंवा मिश्रपीक वा शेताच्या सभोवताली दोन ओळी जवस, कोथिंबीर किंवा मोहरी या पिकाची लागवड केल्यास परभक्षी कीटकांचे संवर्धन होते. पिकावर घाटेअळीचे नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रू कीटक म्हणजे शेतकर्यांचे मित्र कार्यरत असतात व ते आपल्या उपजीविकेतून घाटेअळीचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करीत असतात.
3)   पिकाची पेरणी योग्य वेळी आणि योग्य अंतरावरच करावी.
4)   हरभरा पेरतेवेळी त्यासोबत 100 ग्राम प्रती हेक्टरी ज्वारीचे बियाणे मिसळून पेरावे. पक्षीथांबे म्हणून याचा उपयोग होतो.
5)   हमखास घाटेअळीचा प्रादुर्भाव होणार्‍या शेतात बाजरी, ज्वारी, मका किंवा भुईमूग या पिकांची फेरपालट करावी.


ब) पीक वाढीची अवस्था  –

1. पीक 1 महिन्याचे होण्यापूर्वीच कोळपणी / निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.
2. बांधावरील कोळशी, रानभेंडी व पेटारी ही तणे काढून नष्ट करावीत.
3. पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा 1 ते 1.5 फुट अधिक उंचीचे इंग्रजी टी आकाराचे (T) 50 पक्षीथांबे प्रती हेक्टरी लावावेत. नैसर्गिक शत्रू कीटक जसे क्रासोपा, लेडी बर्ड बीटल व रेडुव्हीड ढेकूण तसेच घाटेअळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, पोपट, निळकंठ, काळी चिणी इत्यादी पिकाध्ये फिरून घाटेअळया वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. परंतु, कीटकनाशकाची वारणी केल्यास ते कीटकनाशकांच्या वासामूळे शेताध्ये येणार नाहीत. त्यांचे अळया वेचण्याचे का सोपे होण्यासाठी शेतामध्ये पक्षी थांबे उभारावे लागतात.
4. प्रती हेक्टरी 5 कामगंध सापळे जमिनीपासून 1 मीटर उंचीवर लावावेत. या सापळ्यात 8-10 पतंग प्रती सापळा सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास कामगंध सापळ्यांची संख्या 20 ते 25 प्रती हेक्टरी करावी.
5. मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.

पीक फुलोर्‍यात व शेंगा भरताना –

1)   पिकावरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा. 
2)   पीक कळी अवस्थेत / फुले येत असताना निंबोळी अर्क 5 टक्केची प्रतिबंधात्मक फवारणी करावी - शेतकर्यांनी पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून ल्यास किंवा 40 ते 50 टक्के पीक फूलोर्‍यावर आल्यानंतर सर्वप्रथ वनस्पतीन्य किंवा जैविक कीटकनाशकांना प्राधान्य द्यावे. त्यासाठी पहिली वारणी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अ‍ॅझॅडीरॅक्टीन 300 पीपीए 50 मिलि. प्रति 10 लिटर पाणी किंवा अळया दिसू लागताच घाटेअळीचा विषाणू एचएनपीव्ही हेक्टरी 500 एल.ई म्हणजेच 500 मिलि विषाणू 500 लीटर पाण्यात मिसळून त्यामध्ये 500 मिलि चिकट द्रव्य (स्टीकर) आणि 200 ग्रॅ राणीपाल (नीळ) टाकून फवारावे. किंवा वातावरणात सापेक्ष आर्द्रता पुरेशी असल्याबिव्हेरिया  बॅसीयाना या जैविक बुरशीनाशकाची 60 ग्रॅ प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यामूळे घाटेअळीचे नियंत्रण होऊन तिचे नैसर्गिक शत्रू कीटकांना अपा न होता त्यांचीसुद्धा घाटेअळीचे नियंत्रण करण्यादत होईल.
3)   पीक काढणीनंतर सुप्तावस्थेतील किडींचा नाश करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी.
4)   कीड नियंत्रणासाठी जैविक पद्धतीचा अवलंब करावा. ( हिरव्या अळीचे जैविक पद्धतीने  व्यवस्थापन कसे करावे यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.)


5)   घाटेअळीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास (सरासरी 1 ते 2 अळया प्रति मिटर ओळीत किंवा 5 टक्के घाट्यांचे नुकसान किंवा 8-10 पतंग प्रती कामगंध सापळयात सतत 2-3 दिवस) शिफाररशीत रासानिक कीटकनाशकांचा वापर करावा; न्यथा वारणी टाळावी. वरील प्रादुर्भाव पातळी गाठल्यानंतर वारणी केल्यास आपल्या उत्पादनाधील घट टाळून वारणीचा खर्च भरून निघेल.

6)    खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्या मिसळून साध्या (नॅपसॅक) पंपाने वारणी करावी. पावर पंपाने वारणी कराची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी वारणी 15 दिवसांचे अंतराने करावी.

1) क्विनॉलफॉ25 टक्के प्रवाही 20 मिलि.

2) ईमामामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 3 ग्रॅ

3) डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 10 मिलि.

4) लँडा साहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिलि.

5) क्लोरँट्रॅनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 2.5 मिलि

6) फॉरमाथीऑन 25 टक्के प्रवाही 20 मिलि

7) फेनव्हलरेट 20 टक्के प्रवाही 5 मिलि

8) सायपरमेथ्रिन 25 टक्के प्रवाही 8 मिलि

9) फोसॅलोन 35 टक्के प्रवाही 14 मिलि

10) ट्रायझोफोस 35% + डेल्टामेथ्रिन 1% हे मिश्र कीटकनाशक 
प्रवाही 25 मिलि

11) मिथोमिल 40 टक्के पा. मि. भुकटी 12.50 ग्रॅम


12) क्लोरपायरीफॉस 20 टक्के 25 मिलि.

Saturday, 24 October 2015

हेलीकोव्हर्पाचे (घाटेअळी) करा जैविक पध्दतीने व्यवस्थापन

हेलीकोव्हर्पाचे (घाटेअळी) करा जैविक पध्दतीने व्यवस्थापन


    सोयाबीन,तूर,हरभरा,कापूस,सुर्यफुल या प्रमुख पिकांबरोबरच जवळजवळ 300-350 पिकावर आढळणारी अळी म्हणजे हेलीकोव्हर्पा अर्मीजेरा. सर्वात घातक असणार्‍या या अळीस आपण पिकानुसार वेगवेगळया नावाने ओळखतो. उदा. हरभर्‍यावरील घाटे अळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, कापसावरील हिरवी अळी वगैरे.
    या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना खोल नांगरट, आंतरमशागत,सापळा पिके (अंबाडी, झेंडू, भेंडी) या मशागतीय पध्दतीने आपण याचे व्यवस्थापन करू शकतो. याचबरोबर प्रकाश सापळे, कामगंध सापळे, पक्षीथांबे, अळयांची वेचणी करणे या यांत्रीकी पध्दतीने पण या किडीचे व्यवस्थापन करता येते.या उपाययोजना केल्या नंतरही या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर रासायनिक उपाययोजनेपूर्वी आपण जैविक पध्दतीचा अवलंब करून या किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
जैविक व्यवस्थापन हे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये नैसर्गीकरित्या आढळणारे परोपजीवी आणि परभक्षी कीटक, सुक्ष्मजीव यांचे जतन व वापर करून किडींचे व्यवस्थापन करतात. हेलीकोव्हर्पाचे जैविक व्यवस्थापन हे खूप वर्षापासून आपणास माहीत आहे. भारतामध्ये हेलीकोव्हर्पावर 75 परोपजीवी आणि 33 परभक्षी आढळून आले आहेत.

अ) घाटे अळीचे परोपजीवी किटक (परोपजीवी किटकाचे नाव, घाटे अळीची अवस्था)

1.  कॅम्पोलेटीस क्लोरीडी - अळी
2.  इरिबोरस अर्जेंटिओपीलोसस - अळी
3.  एनिस्कोपीलस बायकोनॅटस - अळी
4.  कॅरोप्स प्रजाती - अळी
5.  चिलोनस प्रजाती - अळी
6.  इकोसेंलीया इलोटा - अळी
7.  पॅलेक्झोरिस्टा प्रजाती - अळी
8.  अपेंटेलीस ग्लोमेरॅटस - अळी
9.  ब्रॅकॉन हिबेटर - अळी
10.    रोगस प्रजाती - अळी
11.    गोनिओप्थॅलमस हाली - अळी, कोष

12.    ट्रायकोग्रामा कायलोनीस कोष, अंडी



























ब) घाटे अळीचे परभक्षी किटक (परभक्षी किटकाचे नाव, टॅकनीड माशी व कोष)

1.  ढालकीडा - अंडी, अळी
2.  क्रायसोपा - अंडी, अळी
3.  प्रार्थना किटक - अळी
4.  पेंटॅटोमीड ढेकूण - अळी
5.  रेडूव्हीड ढेकूण - अळी
6.  जिओकोरीस ढेकूण - अळी
7.  नॅबीस ढेकूण - अळी
8.  कुंभारीण - अळी
9.  भक्षक कोळी - अळी
10.    भक्षक पक्षी - सर्व अवस्था

वरीलप्रमाणे परोपजीवी किटक आणि परभक्षी कीटक यांचेमुळे घाटेअळीचे जैविक पध्दतीने व्यवस्थापन करता येते.

जैविक आणि वनस्पतीजन्य कीडनाशके

घाटेअळीच्या व्यवस्थापनामध्ये किडींना रोग करणारे सूक्ष्मजीव उदा. जिवाणू, बुरशी व विषाणू यापासून निर्माण केलेली जैविक कीडनाशके महत्त्वाची भूमीका बजावतात. विविध वनस्पतींचा किंवा त्यांच्या भागाचा किंवा त्यावर प्रक्रिया करून त्यांचा उपयोग करता येईल. कीडनियंत्रणात जैविक व वनस्पतीजन्य कीडनाशके हे अतिशय परिणामकारक आणि सुरक्षीत आहेत. काही जैविक किडनाशके ही फक्त हेलीकोव्हर्पालाच मारक असून पर्यावरणासाठी हानीकारक नाहीत. तसेच मित्रकिडींचे संवर्धनही होण्यास मदत होते. जैविक व वनस्पतीजन्य कीडनाशके ही स्थानिक लोकाकडून कमी खर्चामध्ये तयार करता येतात.

जिवाणू

बॅसीलस थुरिनजिएनसिस (बीटी) हे निसर्गामध्ये आढळून येणारे जिवाणू आहेत. हे जिवाणू हेलीकोव्हर्पास विषारी असणारे प्रथिनांचे कण निर्माण करतात. त्यामुळे अळीच्या व्यवस्थापनासाठी इतर पध्दतीसोबत बीटी अतिशय परिणामकारक आहे. बाजारामध्ये पावडर स्वरूपामध्ये बीटी किटकनाशक उपलब्ध आहे.

बुरशी 

मेटारायझीयम अ‍ॅनिसोप्ली, नोमुराई रिलाई, बिव्हेरीया बॅसीयाना आदी बुरशी हेलीकोव्हर्पाला रोगकारक असून त्यांचा उपयोग नियंत्रण व्यवस्थापनामध्ये करता येतो.

सुत्रकृमी

स्टेनेरनिमा प्रजाती ही घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.

विषाणू 

एच.एन.पी.व्ही. (Helicoverpa Nuclear polyhedrosis Virus) म्हणजेच हेलीओकील हे विषाणूजन्य किटकनाशक आहे.तसेच सुर्यफुल पिकावरील अळीचा प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. हे विषाणूजन्य किटकनाशक वापरता येते.

वनस्पतीजन्य किटकनाशके

    निंबोळीच्या बियांचा अर्क, सिताफळांच्या बियांचा अर्क, करंज तेल, निंबोळी तेल, तंबाखू आदिंच्या चाचण्या हेलीकोव्हर्पाच्या नियंत्रणासाठी घेण्यात आल्या. भारतात कडूनिंबाच्या झाडाचा उपयोग फार प्राचीन काळापासून होत आहे. कडुनिंबाच्या विविध भागांचा घरातील तसेच शेतातील किडींच्या व्यवस्थापनासाठी पारंपारीकरित्या शेतकरी उपयोग करत आहेत.